पिण्याचे पाणी
विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची सोय
राजमाता महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बीड ही 2007 पासून मतिमंद व विशेष गरजा असलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था आहे. संस्था विशेष मुलांच्या शिक्षण, उपचार, निवास, कौशल्यविकास आणि सामाजिक समावेशनासाठी दर्जेदार सेवा प्रदान करते. प्रशिक्षित कर्मचारी, तज्ञ डॉक्टर आणि समर्पित टीमच्या मदतीने संस्था विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देते.
या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या मा. डॉ. अजितराव सूर्यवंशी विशेष निवासी विद्यालय, विटा या शाळेस 2009 पासून शासनाकडून 100% अनुदान प्राप्त असून, विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध आहेत. संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. अजितराव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा शिक्षण, थेरेपी, आरोग्यसेवा आणि संस्कारांद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबनाकडे मार्गदर्शन करते. संस्था विशेष मुलांसाठी आशा, आधार आणि सक्षम भविष्यासाठी महत्त्वाचे कार्य करत आहे.
विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची सोय
विद्यार्थ्यांना आपले समान ठेवण्यासाठी लॉकर सोय
विद्यार्थ्यांसाठी आरोग्य सेवा औषधे यांची सोय
मुलांच्या मनोरंजनासाठी टीव्हीची सोय
वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचे टॉयलेट बाथरूमची सोय
विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्लेग्राउंड व प्रशस्त ग्राउंड ची व्यवस्था
शाळेतील विद्यार्थ्यांचे कपडे धुण्यासाठी मिशनची सोय
विद्यार्थ्यांसाठी सर्व वर्गामध्ये फॅन व्यवस्थेची सोय